शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना म्हणजे नाटक कंपनी; औरंगाबादच्या नामांतरावरून देवेंद्र फडणवीसांचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 19:11 IST

औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई: शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. मुंबई महापालिका निवडणूक आल्यानं त्यांना गुजराती समाजाची आठवण झाली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानं त्यांना संभाजी महाराजांची आठवण होऊ लागली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख नाटक कंपनी असा केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.औरंगाबादच्या नामांतराचा विषय म्हणजे शिवसेनेचं नाटक आहे. सेना फक्त प्रस्ताव पाठवते, भूमिका घेत नाही. ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सर्व गोष्टी ठरवून करत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना, काँग्रेसचं राजकारण सुरू असल्याचं ते म्हणाले. 'शिवसेनेनं आता औरंगाबादचं संभाजी नगर करा, असं म्हणायचं. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसनं ते करू नका अशी भूमिका घ्यायची. म्हणजे त्यांना वाटतं, त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे ही नुराकुस्ती सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष निव्वळ नाटक करत आहेत,' असा टोला फडणवीस यांनी लगावला.मी मुख्यमंत्री असताना औरंगाबादमधील रस्त्याच्या कामासाठी पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. मी १०० कोटी देतो असं सांगितलं होतं. पण त्यांना आधीचेच पैसे खर्च करता आले नाहीत. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता असूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं आता नामांतराची भाषा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून केवळ पत्रं पाठवली जातात. बाकी कुठलीही कार्यवाही ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर त्यांना या गोष्टी का आठवतात, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस