शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

“शिवसेना हा कन्फ्यूज पक्ष, दुटप्पी भूमिका घ्यायची सवय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By प्रविण मरगळे | Updated: September 21, 2020 16:04 IST

राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत अशी ग्वाही संजय राऊत घेणार आहे का? निव्वळ राजकारण करु नका, शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने भूमिका घ्यावी अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.  

ठळक मुद्देशिवसेनेची लोकसभेत वेगळी भूमिका असते, राज्यसभेत वेगळी भूमिका असतेपहिल्यांदा शिवसेनेने भूमिका ठरवली पाहिजे, शेतीसंदर्भात शिवसेनेने कधीच भूमिका मांडली नाहीनिव्वळ राजकारण करु नका, शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने भूमिका घ्यावी

नागपूर – भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेती आणि शेतकऱ्याला ज्या बंधनात अडकून ठेवलं होतं, त्यांना मुक्त करण्याचं काम संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकानं केलं आहे. काँग्रेस सरकार असताना त्यांनी या विधेयकाला त्यांचे समर्थन होतं, पण विरोधात गेल्यानंतर हा कायदा शेतकरी विरोधी आहे असा प्रचार करत आहे. काही नेते आपली दुकानदारी चालवण्यासाठी विधेयकाला विरोध करत आहेत. शेतकऱ्यांनी या विधेयकाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, शेतकरी आणि बाजार याचा संबंधात मधली व्यक्ती आल्याने बाजारावरचा शेतकऱ्यांचा कंट्रोल गेला, पिकवणाऱ्याला कुठे विकायचं हे ठरवू शकत नव्हता, शेतकऱ्याला आपलाच माल विकण्यासारखा अडत द्यावी लागते, अशाप्रकारची व्यवस्था देशात तयार झाली. म्हणून काल जे विधेयक मंजूर झालं, त्यातील एका विधेयकामुळे संपूर्ण देश एक बाजार करण्यास मान्यता मिळाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना माल कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकता येत होता. आता देशभरात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येणार आहे. या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोप्पी झाली आहे. दुसऱ्या राज्यात भाव चांगला असला तरी यापूर्वी शेतकऱ्यांना माल विकता येत नव्हता. आता शेतकरी कुठेही माल विकू शकेल ही व्यवस्था आता विधेयकामुळे तयार झाली आहे. काँग्रेसने स्वत:चा २०१९ चा जाहिरनामा वाचला तर त्यांनी विधेयकाला विरोध केला नसता असा टोला त्यांनी लगावला.

दुटप्पी भूमिका घेण्याची शिवसेनेला सवय

तसेच शिवसेना हा एक कन्फ्यूज पक्ष आहे याचं कारण लोकसभेत त्यांची वेगळी भूमिका असते, राज्यसभेत त्यांची वेगळी भूमिका असते. पण यात नवल नाही त्यांना ही सवय आहे, आमच्यासोबत असताना ते सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही भूमिका बजावत होते. ते लोकसभेत वेगळे बोलतात, राज्यसभेत वेगळे बोलतात, पहिल्यांदा शिवसेनेने भूमिका ठरवली पाहिजे, शेतीसंदर्भात शिवसेनेने कधीच भूमिका मांडली नाही, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत अशी ग्वाही संजय राऊत घेणार आहे का? निव्वळ राजकारण करु नका, शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने भूमिका घ्यावी अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.  

२००६ मध्येच महाराष्ट्रात आघाडीने हा कायदा लागू केला

शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालावर विक्रीसाठी २ ते ८ टक्के अडत द्यावी लागत होती, ती आता बंद होणार आहे. यासंदर्भात जाणीवपूर्वक सरकार एमएसपी द्यायची नाही असा प्रचार केला गेला, मात्र जो MSP हमीभाव आहे तो सरकार देणारच आहे. खासगी क्षेत्रातील लोकही कंत्राटी पद्धतीने शेतकऱ्यांशी करार करुन माल विकत घेऊ शकतात. लहान शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे. विरोधकांचा आक्षेप बेगडी आणि लबाडी आहे ते एकाच गोष्टीवरुन लक्षात येईल. कंत्राटी शेतीबाबत केंद्राने कायदा तयार केला हा कायदा २००६ मध्ये आघाडी सरकारने तयार केला. हा कायदा महाराष्ट्रात लागू आहे. याचा फायदा महाराष्ट्राला झाला आहे. बियाणे देण्यापासून तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत कंपनी शेतकऱ्यासोबत कंत्राट करते आणि हमीभावाने शेतीमाल विकत घेते, राज्यात हा कायदा लागू करताना तो बरोबर आहे पण देशात हा कायदा केला तर तो शेतकरी विरोधी आहे हे काँग्रेसचे बेगडी प्रेम आहे. हे पक्ष केवळ राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देशातील ७० टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये शेतकरी काम करत होते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि देशातील कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं आश्वासन सरकार देऊ शकेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्याचसोबत जर हे विधेयक शेतकरीविरोधी असेल तर संपूर्ण देशात विरोध का केला जात नाही? आणि जर संपूर्ण देशात विरोध होत नसेल तर याचा अर्थ असा की या विधेयकाबद्दल काही गोंधळ आहे, संभ्रम आहे, सरकारने ते दूर करावेत. पंतप्रधान मोदींनी सांगितले या विधेयकाबद्दल अफवा पसरविली जात आहे, मग अफवेमुळेच एका मंत्र्याने राजीनामा दिला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी