शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम लखनौतून सपकडून लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:37 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लखनौ मतदारसंघात विरोधकांकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उतरवले जाऊ शकते.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लखनौ मतदारसंघात विरोधकांकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उतरवले जाऊ शकते. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल असून सहा मे रोजी मतदान होईल. विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशात ६३ उमेदवार जाहीर केले असून जन अधिकार पक्षी, अपना दल (कृष्णा पी) आणि डीएनएफ यासारख्या छोट्या पक्षांसाठी १३ जागा सोडल्या आहेत.चारपैकी वाराणसी आणि लखनौतील उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. जागा वाटपाच्या करारानुसार समाजवादी पक्ष लखनौ आणि वाराणसीतून लढणार आहे तरीही सपने लखनौतील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. सपने अभिषेक मिश्रा यांचे नाव लखनौसाठी जाहीर केले होते. परंतु, त्यांना निवडणूक चिन्ह दिले नाही. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांच्यात गुप्त करार झाला आहे, असे स्पष्टपणे दिसते. त्यानुसार भाजपकडील ब्राह्मण, बनिया आदी उच्चवर्णीयांची मते खाण्यासाठी व दलित-यादव आणि मुस्लिमांना त्यातून मदत मिळेल असा विचार मिश्रा यांच्या उमेदवारीमागे आहे.पूनम सिन्हा यांना याच गणितातून सपच्या तिकिटावर उतरवले जाऊ शकते. काँग्रेसच्या तिकिटावर पाटणा साहिब मतदारसंघातून लढत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांना तुमच्या पत्नी सपच्या तिकिटावर लखनौतून लढणार का, असे विचारल्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘सपने जर पूनम सिन्हा यांना लखनौतून तिकीट दिले तर तेथे लखनौत काँग्रेस उमेदवार देणार नाही अशा व्यवस्थेला परवानगी द्यावी, अशी खास विनंती मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केली होती.’ प्रत्यक्षात सिन्हा यांनी राहुल गांधी यांचे त्यांनी दिलेल्या आणखी एका सवलतीबद्दल आभार मानले पाहिजेत. राहुल गांधी यांनी लखनौत मला पत्नीचा प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मी सपच्या इतर कोणत्याही मतदारसंघात प्रचार करायचा नाही या अटीवर.>सिंधी असल्याचा लाभ होणारपूनम सिन्हा या सिंधी असल्यामुळे तेथील १.२५ लाख मतांचा त्यांना जास्तीचा फायदा होऊ शकतो. सिंधी मते ही मोठ्या संख्येने परंपरेने भाजपला मिळतात कारण लालकृष्ण अडवाणी हे सिंधी होत. १९९६ पासून भाजप लखनौत कधीही पराभूत झालेला नाही.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019