शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Shashi Tharoor: शशी थरुर यांच्याकडून भाजपला ‘शब्दांचा’ मार; म्हणाले, “आपण तो शिकून घेतला पाहिजे” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 11:12 IST

Shashi Tharoor: शशी थरुर यांनी भाजपवर टीका करताना वेगळ्याच एका शब्दाचा वापर केला असून, त्याचा अर्थ काय? जाणून घ्या...

नवी दिल्ली: काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत असतात. कोरोनापासून ते भारत-चीन सीमावादापर्यंत अनेक विषयांवरून भाजप नेते, मंत्री यांच्यावर विरोधक निशाणा साधताना दिसतात. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची शैली काहीशी वेगळी आहे. ते टीका करताना अशा शब्दांचा वापर करतात की, अनेकदा शब्दकोष उघडून पाहण्याची वेळ येते. आताही शशी थरुर यांनी भाजपवर निशाणा साधताना वेगळ्याच एका शब्दाचा वापर केला असून, आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. 

शशी थरुर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका करताना अ‍ॅनॉक्रॉसी (Anocracy) हा शब्द वापरलाय. जेव्हा एखादे सरकार लोकशाहीपद्धतीने कारभार करताना त्यामध्ये हुकुमशाही तत्वाचा समावेश करते त्या गोष्टीला अ‍ॅनॉक्रॉसी असे म्हणतात, अशा अर्थाचे ट्विट थरुर यांनी केलेय.

आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे

आपल्या ट्विटमध्ये शशी थरुर म्हणतात की, आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे तो म्हणजे, अ‍ॅनॉक्रॉसी. हे असे सरकार असते जे लोकशाहीला हुकुमशाहीबरोबर मिक्स करते. ते निवडणुकीला परावनगी देतात, विरोधीपक्षाला त्यात सहभागीही होऊ देतात. त्याचवेळी अशा कालावधीत नाममात्र स्पर्धा सामावून घेणार्‍या (सरकारी) संस्था अस्तित्वात असतात. मात्र असे असले तरी ते कशाची जबाबदारी घेत नाहीत, असे शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अशा पद्धतीने शशी थरुर यांनी कठीण शब्द वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे कठीण शब्द वापरले आहेत. 

दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. यावरुनच हे ट्विट असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपा