शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'करेक्ट कार्यक्रमा'ची शरद पवारांकडून स्तुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:36 IST

Politics Sangli JayantPatil Sharadpawar- सांगली महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे मत त्यांनी मांडले.

ठळक मुद्दे'करेक्ट कार्यक्रमा'ची शरद पवारांकडून स्तुतीमहापौरांची भेट : महापालिकेच्या राजकीय घडामोडींचा घेतला आढावा

सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे मत त्यांनी मांडले.महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, आयुब बारगीर यांनी शनिवारी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरेही उपस्थित होत्या.

शरद पवार यांनी यावेळी महापालिकेत नेमके काय व कसे घडले याची माहिती बजाज यांच्याकडून घेतली. फुटलेले व तटस्थ नगरसेवक कोण होते, याची माहिती घेतल्यानंतर पवार यांनी ते यापुढे आपल्यासोबत राहणार आहेत का, याबाबत विचारणा केली. त्यावर बजाज यांनी ते पूर्वी आपल्याकडेच होते, त्यामुळे काही अडचण नाही, असे सांगितले.पवार म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता मिळविल्यानंतर भाजपने आघाडीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण केले. आपलेच लोक फोडून त्यांनी संस्था ताब्यात घेतल्या. त्यामुळे सांगलीत ज्या गोष्टी घडल्या त्या बऱ्या झाल्या. महापौर निवडीतून सांगलीने चांगली सुरुवात केली आहे.

राज्यभरातील आपल्या लोकांना यामुळे बळ मिळेल. याचे लोण सर्वत्र पसरेल. महापालिकेची सुत्रे हातात घेतल्यानंतर आता लोकांसाठी चांगली कामे करावीत. काही अडचणी आल्या तर शासनाकडे चिकाटीने पाठपुरावा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.जयंतरावांकडे पाठपुरावा करामहापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या काही प्रलंबित योजनांबाबतची माहिती पवारांना दिली. त्यावर पवार यांनी या सर्व योजनांसाठी जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करा, शासनाकडून सांगलीसाठी सर्व ती मदत होईल, असे स्पष्ट केले.भाजप नेत्यांच्या वक्तव्याची चर्चाभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची माहिती बजाज यांनी पवारांना दिली. त्यावर जयंत पाटील यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात कसे उत्तर दिले, याचाही खुलासा केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार