शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 5:58 PM

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले.

- डॉ. मनमोहन सिंग(माजी पंतप्रधान) माझे सन्माननीय मित्र आणि सहकारी शरद पवार वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत, याचा मला आनंद होत आहे. पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’ माध्यमसमूह विशेष पुरवणी प्रकाशित करीत आहे, हे समजल्यानंतर हा आनंद द्विगुणित झाला. शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. आमच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री होते. त्यामुळे शेतीविषयक त्यांना असलेले ज्ञान आणि शेतकऱ्यांविषयीचा कळवळा मला जवळून पाहता आला. कृषिमंत्री म्हणून पवार यांनी शेतीविकासासाठी अथक प्रयत्न केले. परिणामी, २००४ ते २०१४ या कालावधीत शेती क्षेत्रात उत्तम काम झाले. आपण केवळ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच झालो नाही, तर अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन देशात झाले आणि त्याची निर्यात आपण इतर देशांना करू शकलो. शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले.सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही ते अग्रेसर आहेत. आपल्या देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचा विकास कसा होईल, याचा ते सातत्याने विचार करीत असतात. विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले नाहीक, तर भारताचा सर्वांगीण विकास होणे कठीण आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. पवार हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी चार वेळा निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने शेती आणि उद्योगक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. या क्षेत्रात आजघडीला जे विकासाचे चित्र दिसते त्यात पवारांचे योगदान मोठे आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही देशाला अजून बराच पल्ला गाठायचा असून त्या दिशेने आपण कायम प्रयत्नशील असायला हवे, असे त्यांचे मत आहे. सामाजिक न्याय आणि समानता या दोन मूल्यांवर त्यांची अतूट निष्ठा आहे.यूपीए सरकारच्या कारकिर्दीत सर्व घटकपक्षांशी समन्वय साधण्याची कामगिरी शरद पवार यांनी लीलया पार पाडली. तत्पूर्वी संरक्षणमंत्री म्हणून काम करताना पवारसाहेबांनी तीनही सेनादलांचे सशक्तीकरण केेले. अशा या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी ईश्वर त्यांना निरोगी आयुष्य देवो, ही प्रार्थना. मानाचे स्थान ५० हून अधिक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांनी भूषविलेल्या प्रत्येक पदावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात त्यांना मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारManmohan Singhमनमोहन सिंगPoliticsराजकारण