शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:47 IST

तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही असं अजित पवार म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे. त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी घडल्याशिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि दोन्ही पक्ष वेगळे झालेआम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत

मुंबई – राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर झालेला सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात गाजला होता, या सत्तेच्या राजकारणात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे, कॅमेरासमोर दिसणाऱ्या घडामोडी आणि पडद्यामागून सुरु असणाऱ्या हालचाली याबाबत केवळ त्यात प्रामुख्याने सहभागी झालेले नेतेच उलगडा करु शकतात, यात प्रमुख नेते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या,  अनेक वर्षाचे मित्र शत्रू बनले तर शत्रूच्या गोटात सहभागी होऊन मित्राला धडा शिकवला. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले. याबाबत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला खरी बाजू असते. मुख्यमंत्रिपदाचं शिवसेनेला वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे सांगतात, पण मला कधीच वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले नाही, ५० टक्के जागा वाटप हे ठरलं होतं, त्यानुसार पत्रकार परिषदेत घोषणा झाली, अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता असं त्यांनी मला सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं असं त्यांनी सांगितले.

तसेच आज अनेकजण पुस्तक लिहित आहे पण त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार आहे, माझ्याकडे सगळा घटनाक्रम डोक्यात आहे, ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येणार नाही असं लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडे  काय पर्याय आहे असा विचार केला त्यावेळी आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत, त्या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या, एका बैठकीत मी होतो, एका बैठकीत नव्हतो, सगळ्या चर्चा मला माहिती आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आम्ही कॉर्नर झलो.. दोन-तीन  दिवस शांत बसलो, कुठलीच कृती केली नाही, पण दोन-तीन दिवसांनी अजितदादांकडून आम्हाला पर्याय आला, शरद पवार जे आधी म्हणाले, स्थिर सरकार भाजपा-राष्ट्रवादीच देऊ शकते, तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे सांगत त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी द इनसाइडर या मुलाखतीदरम्यान केला.

दरम्यान, ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतोय, प्रत्येकजण खंजीर खुपसतोय तेव्हा जगावं लागतं तेव्हा यू हॅव टू बाउन्स बँक. गनिमी कावा करावा लागतो. मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो.रात्री ठरलं सकाळी केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याविरोधात गेला नसता तर आमचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं, आज मागे वळून पाहता तेव्हा तो निर्णय चुकला होता असं वाटतं पण त्याक्षणी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ९९ टक्के यशस्वी होण्यापर्यंत पोहोचून अयशस्वी झालो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना