शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

शरद पवार : लोकशाहीची मूल्ये जपणारा सुसंस्कृत नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 19:26 IST

Sharad Pawar Birthday :  शरद पवार म्हटले की एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते. त्यांच्या सहवासात अर्धा तास जरी घालवला तरी खूप काही शिकायला मिळते. काव्य, संगीत, नाटक आणि देशाचे माणुसकी जाणणारे राजकारण या सर्वांची सांगड त्यांच्यात आहे. देशाला अशा नेतृत्वाची आज खरी गरज आहे.

- डॉ. जब्बार पटेल(ज्येष्ठ दिग्दर्शक) गेल्या पन्नास वर्षांपासून कला, साहित्य, संगीत या विषयांचा उत्तम व्यासंग असलेले शरद पवार यांना मी जवळून ओळखत आहे. ‘घाशीराम कोतवाल’ च्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केलेले सहकार्य आजही विसरू शकत नाही. ‘घाशीराम’बंद व्हायला नको अशी त्यांची व शासनाची भूमिका होती. तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते. अनेक राजकारणी आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणार नाही, असे म्हणतात. पण पवार असे नेते आहेत की, ज्या कलाकृतीला कुणीतरी अडवतंय, विरोध करतंय हे कळल्यानंतर स्वत:च नाटकाच्या प्रयोगावेळी पहिल्या रांगेत जाऊन बसत. ‘घाशीराम’ च्यावेळी याची प्रचीती आली. या नाटकाला प्रे़क्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नाटकाचे प्रयोग कुणीच थांबवू शकले नाहीत. युरोपला हे नाटक जातानाही त्यांचे भरीव सहकार्य लाभले. खरे तर त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. पण नाटकाविषयी विरोधी वातावरण असतानाही कलाकार सुखरूपपणे उड्डाण घेतील इतके त्यांनी लक्ष घातले. कलेची जाण असणारा असा नेता विरळाच! व्यावसायिकपेक्षाही प्रायोगिक, मग ती ‘घाशीराम’, तीन पैशांचा तमाशा’, ‘महानिर्वाण’ ही नाटके असोत, कुणी नवीन प्रयोग करणार असेल तर ते आवर्जून तीन ते चार तास काढून ते नाटक बघायला जाणारच. इतके त्यांचे नाटकप्रेम अफाट आहे.सिंहासन’ चित्रपटावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा विजय तेंडुलकर यांनी मला त्यांच्याकडे जायचा सल्ला दिला. राजकारणावर आधारित चित्रपट करतो आहे. काही मदत मिळाली तर? असे त्यांना म्हटल्यावर त्यांनी मंत्रालयात परवानगी देण्याबरोबरच मंत्र्यांचे बंगलेही चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले.कला, साहित्य या विषयाबाबत त्यांची असलेली जाण यामागे त्यांची फार मोठी सामाजिक, राजकीय दृष्टी आहे. त्यात मानवतेचाही अंश आहे. संविधानाने दिलेली शक्ती पणाला लावली तरच लोकशाही टिकते, असे ठाम मत असलेले जे नेते आहेत, जसे मनुष्याला जगण्याचे, श्वास घेण्याचे अधिकार आहेत तसेच ते आविष्कारांचे आहेत. त्यामुळे कोणाचाही आविष्कार कुणामुळेही थांबता कामा नये, अशीच त्यांची भूमिका असते. प्रत्येक धर्म, त्याच्या शाखा कशा नांदतात, याची एक चिंतनात्मक बैठक त्यांच्याकडे आहे. हा व्यासंग त्यांना वाचनातून व घरातील संस्कारातूनही मिळाला.मनमोकळेपणे संवाद साधणे आणि इतरांच्या अभिव्यक्तीचा आदर राखणे, त्यांना स्वातंत्र्य देणे हे त्यांनी कायमच जपण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट राजकीय टप्प्यावर लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. साहित्यिकांसह विविध पक्षांतील मित्र जोडणे आणि स्वभावातील उमदेपणा हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा विभिन्न पैलू होता. तोच पैलू पवार यांच्यामध्ये अधिक पटीने अनुभवास मिळतो. स्वत:चे व्यक्तिमत्त्व त्यांनी त्या पद्धतीने जपले. लोकशाही मूल्य जपणाऱ्या कोणत्याही गोष्टी मग त्या साहित्य, कला किंवा जगण्यातल्या असो त्यामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. राजकीय क्षेत्रात असूनही सुसंस्कृत असणे खूप दुर्मीळ आहे. त्यांना सदृढ आरोग्य लाभो, भविष्यात देशासाठी अत्यंत भरीव कामगिरी त्यांच्या हातून घडो. हीच मनापासून सदिच्छा.उमदा स्वभाव एका विशिष्ट राजकीय टप्प्यावर लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे  गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. साहित्यिकांसह विविध पक्षांतील मित्र जोडणे आणि स्वभावातील उमदेपणा हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा विभिन्न पैलू होता. तोच पैलू पवार यांच्यामध्ये अधिक पटीने अनुभवास मिळतो.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण