शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:05 IST

महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भवितव्याची चिंता

हरीश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत समस्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे चिंताग्रस्त आहेत. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये म्हणून त्या पक्षातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची कामगिरी पवार यांनी आपले विश्वासू सहकारी व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली आहे. काँग्रेसमधील घडामोडींची खडान्खडा माहिती त्वरित द्यावी, असेही पवार यांनी पटेल यांना सांगितले आहे.

काँग्रेस पक्ष आणखी क्षीण झाला तर त्याचा परिणाम देशातील ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. तो धोका वेळीच ओळखून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खास जबाबदारी दिली आहे. त्यामुळेच पटेल हे मंगळवारी तातडीने मुंबईहून दिल्लीत परतले व आता दिल्लीतच तळ ठोकून आहेत.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक खूप महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, अशी मागणी करणारे एक पत्र त्या पक्षाच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कार्यकारिणीची सोमवारी बैठक झाली होती. काँग्रेसमधील या घडामोडींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत‘ला सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे अशा घडामोडींचा होणारा परिणाम लक्षात घेता सतर्क राहणे आवश्यक असते.

काँग्रेसच्या काही नेत्यांशी बोलणे झाले आहे का, असे विचारता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांनी स्मितहास्य करून उत्तर दिले की, आम्ही दररोज परस्परांशी संवाद साधत असतो. काँग्रेस ही अधिक सबळ बनावी अशी आमची इच्छा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रामध्ये केलेला आघाडी सरकारचा प्रयोग राष्ट्रीय स्तरावरही करणे शक्य होईल. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबद्दल कोणतेही भाष्य करण्यास प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला. वित्तविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलो होतो, असेही प्रफुल्ल पटेल यांनी आवर्जून सांगितले....तर पवारांचे मत खरे ठरेल१९९९ साली काँग्रेस पक्षात जशी फूट पडली होती, तशीच स्थिती पुन्हा उद्भवल्यास ती नामी संधी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर्षी शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. काही काँग्रेस नेते रोज खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास पात्र नाहीत हे मत शरद पवार आधीपासून मांडत आले आहेत. काँग्रेसमध्ये तशा घडामोडी घडल्या तर पवारांचे मत खरे ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींबाबत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली आहे, असे कळते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी