शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार सोशल मीडियाचं नियमन करण्याच्या तयारीत, कायदा तयार करण्यावर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 09:10 IST

Social Media : सोशल मीडियाची व्याप्ती अमर्याद, संविधानाच्या चौकटीत राहून तोडगा काढणं आवश्यक

ठळक मुद्देसोशल मीडियाची व्याप्ती अमर्याद, संविधानाच्या चौकटीत राहून तोडगा काढणं आवश्यक : राम माधवसोशल मीडियाची ताकद वाढली, सरकारही पाडू शकतं, राम माधव यांचं वक्तव्य

केंद्र सरकार सोशल मीडियाचं नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्यावर काम करत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी एका कार्यक्रमादरम्यान याबाबत माहिती दिली. "सरकार सोशल मीडियाचं नियमन करण्याच्या तयारील आहे. आज सोशल मीडियाचा जोर एवढा वाढला आहे की सरकारदेखील पडत आहे. हा ट्रेंड आपल्याला हुकुमशाहीकडे घेऊन जात असून यामुळे लोकशाहीवर घाला घातला जात आहे. या समस्येवर आता संविधानाच्या चौकटीत राहून तोडगा काढणं आवश्यक आहे," असं राम माधव म्हणाले. 'Because India Come First' या पुस्तकाचं प्रकाशन राम माधव यांच्या हस्ते करण्यात आलं. "लोकशाही सध्या तणावाखालून जात आहे आणि अपॉलिटिकल, तसंच नॉन स्टेट ताकदींच्या समस्यांचा सामना करत आहे. सोशल मीडियाची ताकद इतकी वाढली आहे की त्यामुळे एखादं सरकारही पडू शकतं. परंतु हे मर्यादेच्या पलीकडे आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणंही तितकंच कठिण आहे," असं राम माधव म्हणाले.हुकुमशाही वाढवू शकते"अशा ताकदींमुळे हुकुमशाही वाढू शकते. यामुळे लोकशाही कमकुवत होईल. परंतु यावर जो काही तोडगा काढला जाईल तो संविधाच्या चौकटीत राहून काढला गेला पाहिजे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सध्या असलेले कायदे सोशल मीडिया हाताळण्यासाठी तितके सक्षम नाहीत. यासाठी आपल्याला नव्या कायद्यांची गरज आहे. त्यामुळे सरकार या दिशेने काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  राम माधव याचं वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे जेव्हा ट्विटर आणि सरकारमध्ये काही गोष्टींवरून वाद सुरू आहेत. यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काही ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगितलं होतं आणि ट्विटरनं त्यास नकार दिला होता. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाBJPभाजपा