शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुप्त बैठका दोनशे लोकांसमोर विश्रामगृहावर होत नसतात - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:19 IST

Konkan Politics: तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असे ट्विट नीलेश राणे यांनी केले होते.

मुंबई : गुप्त भेटी या दोनशे लोकांसमोर होत नसतात. पण, ज्यांना कोकणाने दोन वेळा नाकारले त्यांनी माझे राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त भेट झाल्याचे ट्विट केले आहे. पण, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. तुमची दखल जनतेने घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नीलेश राणे यांना टोला लगावला.तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असे ट्विट नीलेश राणे यांनी केले होते. यावर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. गुप्त भेट घ्यायची असेल तर रत्नागिरीच्या विश्रामगृहात २०० लोकांसमोर भेट का घेईन, असा प्रश्न करतानाच गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेन, असे ट्विट करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असे जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे, असेही सामंत म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट सहा दिवसांपूर्वीची आहे. मी रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर होतो. रत्नागिरी विश्रामगृहावर एक वाजता पोहोचलो तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती, माजी मुख्यमंत्री समोर येतो तेव्हा स्वागत करण्याची पद्धत असते. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्याचे पालन करणे मी कर्तव्य समजतो. ती समोरासमोरची भेट होती. ज्यांनी आरोप केला, ते प्रचंड मागे होते. त्यामुळे कदाचित दिसण्यात फरक पडू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना मला मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे. अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बरोबर ठेवणार असू तर भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण काय असू शकते याची प्रचिती आजच्या ट्विटवरून कदाचित त्यांना आली असेल, असेही सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNilesh Raneनिलेश राणे