शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:08 IST

sanjay raut : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Mumbai Police commissioner Param bir singh) यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे Maharashtras director general Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत सूचक इशारा देखील दिला आहे. (sanjay raut tweet on the transfer of mumbai police commissioner parambir singh)

संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "मुंबई  तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू (mansukh hiren death Case) प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यामुळे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.

तसेच, या सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. तसेच, त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाParam Bir Singhपरम बीर सिंगMumbai policeमुंबई पोलीसsachin Vazeसचिन वाझे