शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संजय काकडेंच्या भाजपवापसीने पुण्यात काँग्रेसजन आनंदले : भाजपचे नो कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:40 IST

राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. 

पुणे : राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. 

काकडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत पुणे जागा लढवण्याची तयारी केली होती. त्यांच्या या पवित्र्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत काहीसे निराश झाले होते. त्यातच काकडे यांनी जणू उमेदवारी जाहीर झाली या थाटात वावरण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी लढाईआधीच माघार घेतली. मात्र अखेर काँग्रेसच्या श्रेष्ठीनी आधी पक्षात या मग तिकिटाचे बघू अशी भूमिका घेतल्याने त्यांनी भाजपचाच पत्ता कायम ठेवला. इतकेच नव्हे तर शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वतःचे स्थानही पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून आता तरी बाहेरच्या नव्हे तर आपल्याच (मूळ काँग्रेसच्या) माणसाचाच प्रचार करावा लागणार असल्याचे त्यांना समाधान आहे. 

दुसरीकडे काकडे गटाच्या काही समर्थक नगरसेवकांनीही हुश्य केले असून इकडे काकडे तिकडे भाजप अशी अवस्था होण्यापासून तेही वाचले आहेत. शहर भाजपमध्ये मात्र काकडे आहेतच या विचारानेही अनेकांची चिडचिड सुरु झाली आहे. खासदारकीचे  तिकीट जरी त्यांना मिळणार नसले तरी त्यांचे स्थान बघता त्यांचा शब्द टाळता येणार नाही याची अनेकांना कल्पना आहे. त्यामुळे काकडे न गेल्याचे काँग्रेसमध्ये आनंद तर भाजपमध्ये 'नो कमेंट्स' म्हणत आहे ते सहन करायचे अशा आविर्भात मंडळी वावरत आहेत. 

(ता.क. : काकडे यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदरी मिळाल्यास भाजपमध्येही काहीशी नाराजी पसरणार असून तेथील निष्ठावंतही नाराज होऊ शकतात. )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपाcongressकाँग्रेस