शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

...अन् खासदारांनी गाडीचा दरवाजा जोरात आपटला आणि निघून गेले; भाजपात नाराजीनाट्य

By प्रविण मरगळे | Updated: February 15, 2021 13:54 IST

Sangli BJP MP Sanjay Patil Angry News: रविवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, मात्र खासदार असूनही संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) या कार्यक्रमात गैरहजर होते

ठळक मुद्देविजयनगरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती, त्यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होतेखासदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच न बोलता पाटील गाडीत जाऊन बसलेखासदार जात असल्याचं पाहत एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ धावत आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला.

सांगली – खासदार संजयकाका पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सध्या सांगलीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. याला कारण असं की, जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत संजयकाकांचा पारा चढला आणि ते थेट तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. बैठकीत घडलेला हा प्रकार पाहून सदस्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती.(BJP MP Sanjay Patil unhappy in Meeting with Chandrakant Patil at Sangli)

रविवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, मात्र खासदार असूनही संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) या कार्यक्रमात गैरहजर होते, विजयनगरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती, त्यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते, मात्र खासदारांच्या गैरहजेरीची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती, त्यातच बैठक संपतेवेळी संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले, तेव्हा चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते, खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटांच बाहेर आले. त्यावेळी संजयकाकांच्या चेहऱ्यावर काहीतरी बिनसल्यासारखं दिसून आले.

बंगल्याबाहेर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते, त्यांनी खासदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच न बोलता पाटील गाडीत जाऊन बसले. इतकचं नाही तर गाडीत बसताना दरवाजा जोरात बंद करण्यात आला, त्यावेळी तो आवाज बराच काही सांगणारा होता. खासदार जात असल्याचं पाहत एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ धावत आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला. पण तरीही खासदार थांबले नाहीत, त्यांनी तिथून निघून जाणं पसंत केले.

काय आहे वाद?

गेल्या काही दिवसांपासून सांगलीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार आग्रही होते. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे अशी भूमिका घेत माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी संजयकाका पाटील यांची मागणी होती, पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदलाचा निर्णय लोंबकळत ठेवल्याचा राग खासदारांना आला. पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार संतापले असावेत, अशी शक्यता उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील