शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 16:02 IST

Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest : सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest ) वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात आहे, या प्रकरणात अजून माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे. (Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning")

सचिन वाझेंवर झालेल्या अटकेच्या कारवाईप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत मला जेव्हा पुरावे मिळाले तेव्हा मी ते सभागृहात मांडले. राज्यात सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच असे वागू लागले तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे हा लादेन आहे का असा प्रतिप्रश्न करत वकिली करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्ररणात एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. खरंतर हा या प्रकरणाचा एकच भाग आहे. दुसरा भाग समोर यायचा आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामध्येही मोठे पुरावे आणि धागेदोरे एनआयएला मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही कारवाई ही केवळ सुरुवात आहे, असे फडणवीस म्हणाले.  हे प्रकरण केवळ वाझेंपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात कुणाची काय भूमिका आहे, हेही समोर यायला हवे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान, काल अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsachin Vazeसचिन वाझेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण