शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले, राज्यातील कारभाराबाबत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:43 IST

Sharad Pawar spoke on the Sachin Vaze case : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर कालपासून महाविकास आघाडीमधील हे बडे नेते सातत्याने बैठका घेत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईबाबत आज पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात योग्य काम करतेय आणि आम्ही मिळून पुढे जात आहोतसचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या तपासाला सहकार्य करणं राज्य सरकारचं काम आहे चुकीचं काम केलं असेल तर त्याला योग्य ती जागा दाखवून देण्यासाठी आम्ही तपासात सहकार्य करू. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल

नवी दिल्ली/ मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भऱलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली होती. या कारवाईमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची मोठी कोंडी झाली आहे. तसेच विरोधक या प्रकरणावरून अधिकाधिक आक्रमक होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) शिल्पकार शरद पवार यांचीही चिंता वाढलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर कालपासून महाविकास आघाडीमधील हे बडे नेते सातत्याने बैठका घेत आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईबाबत आज पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे. (For the first time, Sharad Pawar spoke openly on the Sachin Vaze case, he said There are no problems in Maha Vikas Aghadi)

सचिन वाझेंना झालेली अटक आणि राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत विचारले असता शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. सरकारमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात योग्य काम करतेय आणि आम्ही मिळून पुढे जात आहोत. काही अडचणी येताहेत मात्र त्यावर आम्ही मिळून मार्ग काढत आहोत. 

यावेळी सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवार म्हणाले की, या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या तपासाला सहकार्य करणं राज्य सरकारचं काम आहे आणि राज्य सरकार तपासासाठी एनआयएला सहकार्य करत आहे. जर कुणी अधिकारांचा गैरवापर केला असेल, चुकीचं काम केलं असेल तर त्याला योग्य ती जागा दाखवून देण्यासाठी आम्ही तपासात सहकार्य करू. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत विचारले असता शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा सल्ला दिला.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवार यांना विचारले असता तेव्हा शरद पवार यांनी हा स्थानिक प्रश्न असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. मात्र सचिन वाझे यांच्याभोवती एनआयएच्या चौकशीचे जाळे अधिकाधिक घट्ट होऊ लागल्यानंतर शरद पवार यांनी  सूत्रे हाती घेत राज्य सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी सूचना देण्यास सुरुवात केली होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणsachin Vazeसचिन वाझेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे