शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

"ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य; सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:05 IST

Rupali Chakankar Slams Yogi Adityanath : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपा सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य" असं म्हणत चाकणकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे" असं म्हणत चाकणकर यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे. 

"उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस" अशा शब्दांत राबडी देवी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राबडी देवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट आणि काही फोटो शेअर केले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज आहे. कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसांच्या वेशात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत" असं राबडी देवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या महिलेचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. यामध्ये महिलेने घडलेला प्रकार सांगितला आहे.

"उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस"

उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी लखीमपुर खीरीच्या पसगवा ब्लॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एक महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण