शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांना आमदारकीचे स्वप्न :विधानसभा लढण्याचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 20:51 IST

पार्थ पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आमदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. मात्र त्यासाठी कोणत्या मतदारसंघाची निवड करणार याबाबत त्यांनी मौन पाळणे पसंत केले.

पुणे : पार्थ पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आमदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. मात्र त्यासाठी कोणत्या मतदारसंघाची निवड करणार याबाबत त्यांनी मौन पाळणे पसंत केले. त्यामुळे पवारांच्या तिसरी पिढीही राजकारणात रस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या रोहित पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्ह्णून काम करतअसून त्यांनी आगामी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहे. मात्र याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असे सांगत त्यांनी थेट अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष राहणार आहे. 

अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ यांच्यासाठी स्वतः शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर रोहित यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रोहित यांच्या फेसबुकपोस्टने राजकीय विश्वात खळबळ उडाली होती. आता खुद्द रोहित यांनीच स्वतःकरिता उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी त्यांच्या मनात नगर जिल्ह्यातील जामखेड मतदारसंघ असून तिथे त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरु केल्याचे समजते. आता त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस