शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ यांना मिळालेल्या उमेदवारीवर रोहित पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:48 IST

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर रोहित पवारांचं भाष्य

पुणे : ‘पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही; मात्र त्यांना कष्ट करावे लागतील, लोकांमध्ये जावे लागेल, संवाद साधावा लागेल, मेहनत करावी लागेल. निवडणूक सोपी नाही,’ असे मत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पवारसाहेबांनी पार्थसाठी माघार घेतली, या काही जणांनी केलेल्या वक्तव्यावर मात्र आपली हरकत आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘पवार साहेब गेली ५० वर्षे राजकारणात आहेत. लोकांचे ऐकूनच त्यांनी निर्णय घेतला असणार. मात्र एक नातू म्हणून व कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी निवडणूक लढवावी असेच मला वाटते. त्यांच्यापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. माघार घेतली असे त्यांच्या इतक्या वर्षांच्या राजकारणात कधीही झालेले नाही. या वेळीही तसे झालेले नाही याची मला खात्री आहे. पार्थसाठी मावळमधील कार्यकर्ते आग्रही होते. राजकारणात शेवटी लोकांचे ऐकावेच लागते, तसे पवारसाहेबांनी ऐकले एवढेच यात झाले आहे. मात्र, माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांची मागणी अशीच आहे, की साहेबांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.शरद पवार यांची माढा मतदारसंघातून नातू पार्थ याच्यासाठी माघार अशी टीका होऊ लागल्याने रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले होते. त्यावर सातत्याने दिवसभर प्रतिक्रिया येत होत्या. आपले ते म्हणणे पवार साहेबांबद्दलच्या आदरातूनच आले होते, असे रोहित यांनी सांगितले. साहेबांच्या कोणत्याही कृतीला काहीतरी अर्थ असतो. त्याचे अनेक पदर असतात, पण त्याचा अभ्यास न करता टीका केली जाते, असे ते म्हणाले. राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा राजकीय प्रवास भेदभावाचे, जातीधर्माचे राजकारण न करता गेली ५२ वर्षे न थकता सुरू आहे. त्यांचे राजकारण कसल्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून सुरू होते, असे रोहित म्हणाले.मान देणारे राजकारणच साहेब करत आलेत...साहेबांच्या राजकारणावर टीका होते, त्यापेक्षा त्यांच्या राजकारणाला मान देणारे अनेकजण आहेत, असे सांगून पवार म्हणाले, सामान्यांच्या म्हणण्याला मान देणारे राजकारणच आतापर्यंत साहेब करत आले आहेत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी मागणी करणाऱ्यांच्या मताला त्यांनी मान दिला.विधानसभेची निवडणूक लढविण्यासंदर्भात रोहित यांनी अनुकूलता दर्शविली. ते म्हणाले की, ज्या भागात माझे नाते निर्माण झाले आहे, तेथील जनतेची इच्छा असल्यास मी विधानसभा लढविण्याचा विचार नक्की करेन.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार