शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Bihar Election 2020 : "10 लाख नोकऱ्यांसाठी बजेट कमी पडले तर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे पगार कापले जातील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:56 IST

Bihar Election 2020 Tejashwi Yadav And Nitish Kumar : 10 लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं नितीश कुमार यांनी म्हटलं होतं त्याला आता तेजस्वी यांनी उत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल यांच्यातील ‘काँटे की टक्कर’ यामुळे सगळ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागलेले असले तरी तब्बल 56 जागांवर पोटनिवडणुकीसाठी 11 राज्यांमध्ये मतदान होणार आहे. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. 10 लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं नितीश कुमार यांनी म्हटलं होतं त्याला आता तेजस्वी यांनी उत्तर दिलं आहे. 

10 लाख नोकऱ्यांसाठी 1 लाख 44 हजार कोटींची आवश्यकता आहे. एवढा निधी कुठून आणणार? असा सवाल नितीश कुमार यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नावर तेजस्वी यांनी "10 लाख नोकऱ्यांसाठी बजेट कमी पडले तर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे पगार कापले जातील" असं म्हणत आता पलटवार केला आहे. "सरकाऱ्याच्या बजेटमधील 80 हजार कोटी रुपये खर्च होत नाहीत. यानंतरही 10 लाख तरुणांना नोकरी उपलब्ध देण्यासाठी निधीची कमतरता असेल तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदारांचे पगार कापले जातील" असं तेजस्वी यादव य़ांनी म्हटलं आहे. 

"सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल"

तेजस्वी यांनीही शिक्षण कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल. याशिवाय दोन नवीन विद्यापीठांची स्थापन करण्याची घोषणा देखील तेजस्वी यादव यांनी केली आहे. बेगुसरायमध्ये राष्ट्रकवी दिनकर आणि मिथिलांचलमध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर विद्यापीठ स्थापन केले जाईल असं तेजस्वी यांनी म्हटलं आहे. आरजेडीची आश्वासनं ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं मुख्यमंत्री नितीश कुमार याआधी म्हणाले आहेत. 

"नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला

10 लाख नोकऱ्या देण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या 15 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात संयुक्त बिहारमध्ये फक्त 95 हजार नोकर्‍या देण्यात आल्या होत्या असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना याआधीही सणसणीत टोला लगावला आहे. "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारने ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. 

"रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात"

जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल एक विधान केलं असून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक हे मुंबई-दिल्लीला जातात" असं शशि भूषण हजारी यांनी म्हटलं आहे. "माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोक कामाच्या शोधात इतर राज्यामध्ये जात नाहीत" असा दावा हजारी यांनी केला आहे. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोक हे फक्त हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं हजारी यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार