शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी देणारा निकाल; सतेज पाटलांनी शब्द खरा करून दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:38 IST

दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत.

विश्वास पाटीलकोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखविला.  दिल टाकलेल्या पैलवानासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसला त्यांनी लढायला आणि जिंकायलाही शिकविल्याचे प्रत्यंतर या निकालाने आले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मिळालेले भक्कम पाठबळ हेदेखील या विजयाचे महत्त्वाचे कारण आहे.

दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे चार व आता विधानपरिषदेचे दोन असे तब्बल सहा आमदार झाले आहेत.  या मतदारसंघातून एकूण सहाजण इच्छुक होते; परंतु आसगावकर यांच्या उमेदवारीवर मोहोर उठविल्यावर अन्य पाचजणांना एकत्र येऊन त्यांना विश्वास दिला व जिल्ह्यात त्यांच्यात मतैक्य घडविले. आसगावकर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले होते. त्यांचा चेहराही परिचित नव्हता; त्यामुळे त्यांच्या मागे जनमत उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. ‘तुम्हाला शिक्षक हवा की संस्थाचालक?’ असाही प्रचार झाला; परंतु तो मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची सगळी यंत्रणा उभी केली. आसगावकर उमेदवार असले तरी आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे ते या निवडणुकीत राबले. त्यांना पहिल्या पसंतीची मते कशी जास्त मिळतील असे प्रयत्न त्यांनी केले. एकदा डोक्यात निवडणूक भिनली की त्यात गुलाल लागेपर्यंत उसंत घ्यायची नाही असा त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यामुळेच ते नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून विजय खेचून आणू शकले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी खूप मेहनत घेतली.

टॅग्स :congressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक