शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 22:24 IST

Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विस्तारापूर्वी रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह १२ मंत्र्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला होता. दरम्यान, मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. दोन्ही वरिष्ठ नेत्यांना पक्षामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात निवडणुका होत असलेल्या राज्यांचे प्रभारीपद या नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक आणि हर्षवर्धन यांच्यासह राही अन्य नेत्यांचा पक्षाच्या संघटनेमध्ये समावेश करून त्यांना या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आधीही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. निशंक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर हर्षवर्धन यांनी भाजपाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलांमध्ये भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी यांच्यासह पक्षसंघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पाच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद धोरण लागू आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी करण्यात आलेल्या नेत्यांच्या जागी संघटनेमध्ये नव्या लोकांना जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आलेल्या अन्य नेत्यांनाही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते.  

टॅग्स :BJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादPrakash Javadekarप्रकाश जावडेकरPoliticsराजकारण