शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राठोडांचे मंत्रिपद गेले; पश्चिम वऱ्हाडात आशा पुन्हा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:22 IST

रायमुलकर, बाजाेरिया, देशमुख इच्छुक. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे.

राजेश शेगोकारलोकमत न्यूज नेटवर्क अकोला : वनमंत्री संजय राठाेड यांनी राजीनामा दिल्यामुळे विदर्भातील एक मंत्रिपद कमी झाले आहे, त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे. पश्चिम विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिमचे पारडे जडच आहे. दुसरीकडे सामाजिक समीकरण लक्षात घेऊन यवतमाळमधील संजय राठाेड यांना मंत्रिपदाची संधी मिळाली हाेती. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील आ. डाॅ. संजय रायमुलकर व आ. गाेपीकिशन बाजाेरिया या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले हाेते. राठाेड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांच्या दाव्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

बुलडाण्याचे डाॅ. रायमुलकर यांना सध्या पंचायतराज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रिपदासाठी खा. प्रतापराव जाधव यांनीही माताेश्रीवर साकडे घातले हाेते. मात्र त्यांची समजूत घालण्यात आली. अकाेल्याचे आ. बाजाेरिया यांचाही मंत्रिपदासाठी दावा प्रबळ हाेता. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात त्यांचे नाव मागे पडले. आता त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या दाेन ज्येष्ठ आमदारांसह पहिल्यांदाच निवडून आलेले अकाेल्यातील बाळापूरचे आ. नितीन देशमुख व बुलडाण्याचे संजय गायकवाड या दाेघांचीही मंत्रिपदासाठी दावेदारी मानली जाते. पहिल्यांदाच निवडून आल्यावरही त्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाची छाप पाडली आहे. 

राष्ट्रवादीचे एकच आमदार थेट कॅबिनेटराज्यात सत्तांतर हाेत असताना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ. राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवेसनेचे चार सदस्य असतानाही एकालाही मंत्रिपद नसल्याचे शल्य शिवसैनिकांमध्ये आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाPooja Chavanपूजा चव्हाण