शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेस मंत्री भिडले; पारा इतका चढला की बघणारेच अवाक् झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 13:51 IST

बोर्डाच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी गहलोत सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमले होते.

ठळक मुद्देराजस्थानच्या गहलोत सरकारमध्ये मतभेद सतत वाढत आहेतप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला वाद वाढत असताना इतर सहकारी मंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

जयपूर – राजस्थानच्या गहलोत सरकारमध्ये भलेही सर्वकाही ठीक असल्याचं दाखवलं जात असलं तरी वारंवार प्रदेश काँग्रेसमधील सरकारमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यात खडाजंगी झाली.

या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना सुनावलं. वाद वाढत असताना इतर सहकारी मंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयावरून बैठकीचं आयोजन केले होते. सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जमले होते तर मुख्यमंत्री वर्चुअलच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या परीक्षांचा निर्णय झाल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा डोटासरा आणि धारीवाल यांच्यात वाद झाला.

कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

या दोघांमधील वाद शमल्यानंतर गोविंद सिंह डोटासरा यांनी शांती धारीवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे केली. ते म्हणाले की, पार्टी संघटनेच्या विषयावर काही चर्चा सुरु असेल तर अध्यक्षांना बोलायलाही दिलं जात नाही. अशा वर्तवणुकीवर कारवाई होणं गरजेचे आहे. डोटासरा है बैठकीतून जायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढून त्यांचे म्हणणं ऐकून घेतले.

बैठकीच्या बाहेर येऊनही भिडले

कॅबिनेटची बैठक संपल्यानंतरही धारीवाल आणि डोटासरा एकमेकांशी भिडले. या दोघांचा वाद इतका जोरात होता की सगळेच जण अवाक् झाले. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर मंत्री एकमेकांसोबत जोरात भांडत असल्याचं पाहून सुरक्षारक्षकही चक्रावले. आता हे सपूर्ण प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे पोहचवलं जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान