शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधीकडून विरोधी पक्षासाठी आज ‘ब्रेकफास्ट’, पेगासस व इतर मुद्यांवर आखणार रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 09:37 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना मंगळवारी सकाळी ‘ब्रेकफास्ट’साठी आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने पेगासस फोन टॅपिंगसह इतर प्रश्नांवर विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांसोबत राहुल गांधी चर्चा करणार आहेत. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना मंगळवारी सकाळी ‘ब्रेकफास्ट’साठी आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने पेगासस फोन टॅपिंगसह इतर प्रश्नांवर विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांसोबत राहुल गांधी चर्चा करणार आहेत. संसद भवनाजवळील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे सकाळी ९.३० वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आरजेडी तसेच डाव्या पक्षांच्या सदस्यांसोबत राहुल गांधी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखण्यासाठी यावेळी प्रामुख्यान चर्चा होणार आहे. पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण