शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:23 IST

डाव्यांची दमछाक सुरूच; भारतीय जनता पक्षाची या खेपेस पुन्हा परीक्षा

- पोपट पवार तिरूअनंतपूरम: शबरीमाला मुद्द्यावरून विरोधकांनी डाव्या आघाडीला कोंडीत पकडले असतानाच, राहुल गांधी यांनीही केरळमधूनच लढण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मल्याळी जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत राहुल गांधी यांनी स्थान पटकाविले आहे.मंगळवारी केरळच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. शबरीमाला आंदोलन, कार्यकर्त्यांवरील हल्ले, धार्मिक धुव्रीकरण या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी स्थानिक प्रश्नांवरही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डाव्यांवर निशाना साधला. त्यामुळे दक्षिणेतील हे राज्य पुन्हा डाव्याची सोबत करणार की काँग्रेसला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफ आघाडीत खरा सामना रंगणार आहे. भाजप तिसऱ्या स्थानासाठी धडपडत असला तरी एक-दोन जागांवर भाजपही धक्कादायक निकाल देऊ शकतो. काँग्रेसप्रणित यूडीएफ ने सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काँग्रेस १६ जागा लढवत असून मित्रपक्ष मुस्लीम लीग २, केरळ काँग्रेस( मणी गट) १, आणि आरएसपीला १ जागा दिली आहे. डाव्यांच्या एलडीएफ नेही २० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागा लढवत आहे. भाकपने ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एलडीएएफने दोन अपक्षांना पाठिंबा दिला आहे. डावे व काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही १५ जागांवर उमेदवार उभे केले असून भारतीय धर्म जन सेनेला ४ जागा सोडल्या आहेत. कधीकाळी राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरची असलेल्या डाव्या पक्षांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा व केरळमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगणाºया डाव्यांचे सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत. केरळमधील हाच त्यांचा आधार आहे.वायनाड काँग्रेससाठी सोपाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपने भारतीय धर्म जन सेनेला सोडली असून, त्यांनी तुषार वेल्लापल्ली यांना मैदानात उतरवले आहे. एलडीएफच्या वतीने येथे पी.पी. सुन्नीर रिंगणात आहेत. वायनाडमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असून, आदिवासी समाजही मोठा आहे. वायनाड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस