शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बळकट झाला तरच राहुल गांधी पंतप्रधान; ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:23 IST

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीपासून ते सगळ्या पदांसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत पक्ष बळकट होणार नाही. पक्ष बळकट होईल तेव्हाच राहुल गांधी पंतप्रधान होणे शक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हाच मुद्दा उपस्थित केल्यावर ज्या लोकांना जनाधार नाही तेच याला विरोध करीत आहेत. ते लोक फक्त लाळघोटेपणा करून पदावर राहू इच्छितात.’’

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला. त्या हंगामी अध्यक्ष होत्या त्यामुळे प्रदीर्घ काळ त्या पदावर राहू शकत नाहीत. राहुल गांधी अध्यक्ष होऊ इच्छित नाहीत त्यामुळे आम्ही पूर्णवेळ अध्यक्ष असावी, अशी मागणी केली.’’

पक्षातील राहुल गांधी यांचे समर्थन करणाऱ्या युवक नेत्यांवर थेट हल्ला करताना आझाद यांनी या मंडळींनी पक्षासाठी काय काम केले? असा प्रश्न विचारला. आम्ही या पक्षासाठी राजीव गांधी, सीताराम केसरी, पी. व्ही. नरसिंह राव आणि इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम केले आणि संघटनेच्या निवडणुकाही पाहिल्या. परंतु, ३० वर्षांपासून निवडणूका झालेल्याच नाहीत. आमची मागणी आहे की, गटापासून जिल्हा, जिल्ह्यापासून प्रदेश आणि प्रदेशापासून केंद्रीय स्तरावर थेट निवडणुका व्हाव्यात. पूर्णवेळचा अध्यक्ष असावा. आम्ही बळकट होऊन भाजपला टक्कर देऊ शकू, असेही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद यांचा आक्रमकपणा हे दाखवत होता की, हा संघर्ष राहुल गांधींचे पाठीराखे व जुन्या नेत्यांमधील असून तो असा सहज संपणारा नाही. २३ नेत्यांनी लिहिलेले पत्र आझाद यांना कोणत्याच दृष्टिकोनातून चुकीचे वाटत नाही. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, राहुल गांधींचे समर्थक लाळघोटेपणा करून पदांवर राहू इच्छितात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस