शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्ण विखेंच्या राजकारणासाठी ससाणेंचा बळी?

By सुधीर लंके | Updated: April 26, 2019 04:00 IST

शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे काँग्रेसविरोधातच बंड पुकारले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला

सुधीर लंकेअहमदनगर: शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे काँग्रेसविरोधातच बंड पुकारले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विखेंच्या आग्रहामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. नगर जिल्ह्यात काँग्रेसची सर्व संघटना माझ्या पाठिशी आहे हे दाखविण्याचा विखे यांचा प्रयत्न सुरु आहे.

पुत्र सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे हे काँग्रेसपासून फटकून आहेत. त्यांनी पक्षासाठी एकही प्रचारसभा जिल्ह्यात व राज्यातही घेतली नाही. नगरचे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे विखे यांचे समर्थक होते. ते भाजपला मदत करतील हा संशय असल्याने त्यांना पदमुक्त करुन पक्षाने करण ससाणे यांना जिल्हाध्यक्ष केले होते. ससाणे हे दिवंगत माजी आमदार व शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. पद जाताच शेलार हे अपेक्षेप्रमाणे भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले. स्वत: राधाकृष्ण विखे यांनीही नगर मतदारसंघात भाजपच्या काही बैैठकांना उपस्थिती दर्शवली.

नगरचे मतदान संपल्यानंतर विखे आता शिर्डीत सक्रिय झाले आहेत. शिर्डीत भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात मोर्चेबांधणी करत आहेत. काँग्रेसने या मतदारसंघात वातावरणनिर्मितीही केली आहे. विखे या प्रचारापासून मात्र अलिप्त आहेत. उलट त्यांनी बुधवारी श्रीरामपूर येथे जयंत ससाणे यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मतदारसंघात कुणाचा प्रचार करायचा ही भूमिका गुरुवारी ठरवू अशी भूमिका त्यांनी या मेळाव्यात घेतली. मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन प्रचारात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. हे पाऊल त्यांनी विखे यांच्या सांगण्यावरुनच उचलल्याचे बोलले जाते. ससाणे यांची राजीनामा देण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी हे पाऊल उचलावे अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे समजते.

ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारुन तीन आठवडेच झाले होते. तीन आठवड्यातच त्यांचा असा राजकीय बळी गेला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शिर्डी मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने याचे राजकीय पडसाद थेट दिल्लीत उमटतील अशी शक्यता आहे. विखे यांनी एकप्रकारे थेट काँग्रेस हायकमांडलाच इशारा दिला आहे. काँग्रेस या घटनेची काय दखल घेणार याची उत्सुकता आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी शिर्डीत रामदास आठवले यांच्या विरोधात काम केले. मात्र, जयंत ससाणे यांनी प्रामाणिकपणे आठवले यांना साथ दिली होती. सेना-भाजपच्या विचारसरणीपासून ते दूर होते. भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपुरातून आमदार म्हणून निवडून आणण्यात त्यांचीच महत्त्वाची भूमिका होती. आता त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस संपविण्याचा विडा उचलला आहे. ससाणे यांचे समर्थक थेट सेनेच्या प्रचारात जाणार का? याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारणahmedabad-west-pcअहमदाबाद पश्चिम