शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:29 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर प्रियंका गांधींनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर प्रियंका गांधींनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या निमित्तानं प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदी आमने-सामने आले आहेत. ब्लॉगमध्ये मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली, त्याचा प्रियंकानंही पलटवार केला. इलाहाबादहून काशीपर्यंत गंगा यात्रा करणाऱ्या प्रियंका यांना मिर्जापूरमध्ये मोदींच्या ब्लॉगसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या, त्यांना आमच्यावर जेवढी टोकाची टीका करायची आहे, तेवढी करावी, पण आम्ही त्याच जोशात लढणार आहोत. त्यांच्या विरोधात बोलण्यास लोक घाबरतात, पण आम्ही त्यांना घाबरत नाही. जे लोक सत्तेत असतात, त्यांना वाटतं इतरांना आपण घाबरवू, पण आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपानं देशातल्या सर्व लोकशाही संस्थांना नेस्तनाबूत केलं आहे. आपण सर्व ज्या व्यवस्थेचे भाग आहोत, त्या व्यवस्थेलाच त्यांनी नुकसान पोहोचवलं आहे. पंतप्रधानांनी लोकांना मूर्ख समजू नये, जनतेला सर्वकाही कळतं. मोदींनी जनतेला मूर्ख बनवणं आधी बंद करावं, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, आमच्या सरकारनं कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडलं. एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेनं काम करतं.  काँग्रेसनं देशाच्या संस्थांना कमकुवत केलं आहे. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसनं आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसनं संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारनं सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं एक साधन समजलं. त्यामुळेच जवानांना काँग्रेसनं कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक