शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"प्रताप सरनाईक काही साधुसंत नाहीत, माहिती घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 14:25 IST

ED Raid On Pratap Sarnaik : सरनाईकांच्या घरावर छापे टाकत ईडीने त्याचा मुलगा विहंग याला ताब्यात घेतले आहे. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शेवट आम्ही करू, असा इशारा दिला आहे. तर भाजपाचे राज्यसभा खासदार आणि शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी सरनाईक काही साधूसंत नाही, असा आरोप केला आहे. 

सरनाईकांच्या घरावर छापे टाकत ईडीने त्याचा मुलगा विहंग याला ताब्यात घेतले आहे. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. तर महाआघाडी सरकारचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात व छगन भुजबळ यांनी या कारवाईचा विरोध केला आहे.  'अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,' असं भुजबळ म्हणाले.

प्रताप सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई आहे आणि कायदेशीर बाबींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. मीडियाने आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे नारायण राणे यांनी सांगितले. 

फडणवीसांची प्रतिक्रियाशिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे,' असं फडणवीस म्हणाले.  शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय