शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 2:47 AM

१० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले.

पुणे : ‘‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्यघटना कळत नसताना त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले?,’’ असा जोरदार हल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चढवला. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून १० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले.‘‘एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटले म्हणजे होणार. ‘आम्ही होऊ देणार नाही,’ ही भूमिका योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊ द्या. आरक्षण घटनेच्या आधारे आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. ही कायदेशीर बाब आहे,’’ असे म्हणत अ‍ॅड. आंबेडकर यांनी छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या मतालाही विरोध दर्शवला. गुरुवारी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.दोन्ही ‘राजां’चा बंदला पाठिंबा असल्याचे कुठेही वाटले नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर; पण ते आरक्षण सोडून इतर मुद्द्यांवरच जास्त भर देत आहेत, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. कोणालाही अंगावर घ्यायला मी घाबरत नाही. आरक्षण घटनेने दिले आहे. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्याशी उघड भांडण करायचे आहे का? असाही प्रश्नही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.उदयनराजेप्रेमींकडून प्रकाश आंबेडकर यांचा निषेधसातारा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या टीकेचा उदयनराजेप्रेमी यांच्याकडून सातारा शहरामध्ये जोरदार निषेध करण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, की आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. उदयनराजे हे आमचे आदर्श आहेत. प्रकाश आंबेडकरांसारख्या अभ्यासू व्यक्तीकडून हे अपेक्षित नव्हते.ओबीसी कोट्यातून आरक्षण मागू नयेमराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती