शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वर्चस्वाला धक्का?

By प्रविण मरगळे | Updated: February 17, 2021 11:29 IST

Pooja Chavan Suicide Case, Shiv sena Politics between Sanjay Rathod And Bhavana Gawali: मुख्यत: संजय राठोड यांच्यामागे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भूमिका महत्त्वाची आहे

ठळक मुद्देही आत्महत्या दुर्दैवी आहे, परंतु थेट संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहेधनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राजीनामा घेतला नाही, मग संजय राठोड यांना राजीनामा का द्यायला लावायचा?भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात राजकीय वर्चस्वाचा वाद जिल्ह्यात नेहमीच रंगला आहे.

प्रविण मरगळे

मुंबई – परळीच्या पूजा चव्हाण(Pooja Chavan) या तरूणीने पुण्यात आत्महत्या(Suicide) केली, या आत्महत्येसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) यांना जबाबदार धरलं. संजय राठोड यांची हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी भाजपाने(BJP) केली. राठोड यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिवसेनेतही दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलं होतं.(Will CM Uddhav Thackeray take action against Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case and push Minister Eknath Shinde dominance in Shiv Sena?)

मुख्यत: संजय राठोड यांच्यामागे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भूमिका महत्त्वाची आहे, संजय राठोड यांच्यावर कारवाई करू नये यासाठी शिंदे सक्रीय असल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, ही आत्महत्या दुर्दैवी आहे, परंतु थेट संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहे, पोलीस योग्य तो तपास करतील असं त्यांनी सांगितले होते. धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या प्रकरणात राजीनामा घेतला नाही, मग संजय राठोड यांना राजीनामा का द्यायला लावायचा? असा प्रश्न एका गटाकडून विचारला जात आहे, शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील, त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असंही म्हटलं जात आहे.

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”; सरपंचाचा गंभीर आरोप, भाजपाचा राजीनामा

संजय राठोड हे यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार आहेत, यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण पाहिले तर याठिकाणी प्रखरतेने शिवसेनेत दोन गट असल्याचं दिसून येते. एक गट खासदार भावना गवळी यांचा तर दुसरा संजय राठोड यांचा. संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यापासून गवळी गट सक्रीय झाला आहे. पक्ष आणि सरकार अडचणीत येत असेल तर संजय राठोड यांचा राजीनामा द्यायला हवा यासाठी विदर्भातील काही नेते सक्रीय आहेत. भावना गवळी(Bhavana Gawali) आणि संजय राठोड यांच्यात राजकीय वर्चस्वाचा वाद जिल्ह्यात नेहमीच रंगला आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांनी संजय राठोड यांच्या राजकीय वर्चस्वाला नेहमीच आव्हान दिलं आहे. राठोडांनी दिग्रस मतदारसंघातच राहावं असं त्यांना वाटतं, परंतु संजय राठोड यांचं यवतमाळमधील राजकीय वजन नेहमी वरचढ राहिलेले आहे, काही मोजके समर्थक वगळता संजय राठोड यांच्यामागे शिवसैनिक राहिले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम वगळता भावना गवळी आणि संजय राठोड हे कधीच एकाच व्यासपीठावर येत नाहीत. शिवसेनेच्या बॅनरवरदेखील यांच्यातील वाद दिसून येतो.

'ही' शिवसेना-राष्ट्रवादीची मध्यावधी निवडणुकीची तयारी, की...?; हालचालींना वेग; स्वबळ वाढवण्याचे वेध

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे भावना गवळी गटाला आयती संधी चालून आली आहे. यातच संजय राठोड हे शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाचे मानले जातात. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यामागे बहुतांश आमदार आहेत, त्याचसोबत संजय राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाची ताकद आहे. यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली याठिकाणी बंजारा समाजाचं वर्चस्व आहे, त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) सावध भूमिका घेत आहेत.   

एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहेत. दरम्यान, शिवसेनेत कोणतेही गटतट नाहीत, उद्धव ठाकरे संजय राठोड प्रकरणात निर्णय घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena MP Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे