शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Pooja Chavan : शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

By बाळकृष्ण परब | Updated: February 24, 2021 10:11 IST

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod's reaction on Sharad Pawar's displeasure : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी काल सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.

मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी काल सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर आता संजय राठोड यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. (Sanjay Rathore's response to Sharad Pawar's displeasure over the show of strength)काल झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर आता मंत्री संजय राठोड हे आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून शरद पवार यांच्या नाराजीबाबत विचारले असता संजय राठोड म्हणाले की, शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला याबाबत काही बोलायचे नाही. मी जे काही बोलायचं आहे ते काल बोललो आहे. काल सांगितल्या प्रमाणे आजपासून मी माझ्या शासकीय कामांना सुरुवात करणार आहे. आता मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत जात आहे. 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.

 

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडSharad Pawarशरद पवारPooja Chavanपूजा चव्हाणPoliticsराजकारण