शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By बाळकृष्ण परब | Updated: March 1, 2021 12:24 IST

Pooja Chavan death case, Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan death Case) प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ( "Moral strength does not come when you have to tell a blatant lie", Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray)प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला असतानाही  ते दिसत होतं. 

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेचं काय असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

यावेळी मोहन डेलकर या खासदारांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येबाबत सवाल विचारला असता फडणवीस म्हणाले की, आत्महत्या कुणाचीही असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरून सुसाईड नोट सापडली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. कुणीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपाच्या नेत्याचं नाव नाही. जर त्या सुसाइ़ड नोटमध्ये भाजपाच्या नेत्याचं नाव असतं तर ते एवढ्यात जाहीर केलं, असतं, असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेPooja Chavanपूजा चव्हाण