शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

pooja chavan death case : मलाही लेकीबाळी आहेत म्हणत चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडलांना केलं असं आवाहन

By बाळकृष्ण परब | Updated: February 27, 2021 14:18 IST

Chitra Wagh appealed to the father of Pooja Chavan : काल पूजा चव्हाणच्या वडिलांनी आपल्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा दिला होता.

नाशिक - पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. (pooja chavan death case) या प्रकरणात संशयाची सुई शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडे वळली असून, विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) ह्या राठोड यांच्याविरोधात कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेली चर्चा आणि भाजपाकडून(BJP) या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात उठवण्यात येत असलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर काल पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) वडिलांनी आपल्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा दिला होता. आता आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजा चव्हाणच्या वडिलांना चित्रा वाघ यांनी आवाहन केले आहे.  (Saying that I also have daughters, Chitra Wagh appealed to the father of Pooja Chavan who warned of suicide)

चित्रा वाघ म्हणाल्या की, या प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाही. कुठलीही मुलगी, महिलेवरून राजकारण करावं लागलं तर मी राजकारण सोडून देईन. मात्र या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या संजय राठोड यांच्यावर कारवाई व्हावी, असे पूजाच्या वडलांना वाटत नाही का. तसेच याबाबत त्यांची काही तक्रार नसली. पोलीस या प्रकरणात स्युमोटो दाखल करू शकतात. पूजा ही आता केवळ तिच्या आई-वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राची मुलगी झाली आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. तिचे आईवडील दबावात आहेत. एवढ्या मोठ्या माणसाला आव्हान देणं कठीण आहे. मी विरोधात बोलले तर काय झालं हे तुम्ही पाहतच आहात. तसेच मी संजय राठोड याला बंजारा समाजाचा मानत नाही. बंजारा समाजाने वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक अशी रत्ने दिली. संजय राठोडसारखा नराधम बंजारा समाजाचा असूच शकत नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. 

यावेळी चित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघPooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडPoliticsराजकारण