शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Video: हे, घ्या २ हजार...१ नंबरच बटण, कमळ चिन्हावर मतदान करा; भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

By प्रविण मरगळे | Updated: November 3, 2020 15:37 IST

Gujarat Bypoll Election News: गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देव्हिडिओमध्ये एक भाजपा कार्यकर्ता मतदान करण्यासाठी निघालेल्या लोकांना पैसे देताना दिसत आहे.जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर सीईओ डॉ. मुरलीकृष्ण यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिलेभाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कर्जन सीटमधील इंटोला आणि गोसींद्र या गावात मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

अहमदाबाद – बिहार विधानसभा निवडणुकीसोबत देशातील अन्य राज्यात पोटनिवडणुका होत आहेत. यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत आहे. गुजरातमध्येही विधानसभेच्या जागेसाठी घेण्यात येत असलेल्या पोटनिवडणुकीचं आज मतदान आहे. मात्र या मतदानाच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यांकडून लोकांना पैसै वाटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. व्हिडिओमध्ये एक भाजपा कार्यकर्ता मतदान करण्यासाठी निघालेल्या लोकांना पैसे देताना दिसत आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर सीईओ डॉ. मुरलीकृष्ण यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराजसिंह परमार यांनी फिर्याद दिली आहे. व्हिडीओमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मत देण्यासाठी चाललेल्या मतदारांना पैसे देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कर्जन मतदारसंघातील मतदान केंद्रावरचा आहे.

काँग्रेसचा आरोप आहे की, भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कर्जन सीटमधील इंटोला आणि गोसींद्र या गावात मतदारांना पैसे वितरित केले. कॉंग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर कर्जन सीटचे नोडल अधिकारी बी.बी. चौधरी हे पथकांसह तपासासाठी रवाना झाले आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही पैसे वाटप करत असल्याचे काही फोटोही प्रसिद्ध केले. गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.५७ टक्के मतदान झाले. कोरोनामुळे, या वेळी  १५०० मतदारांनुसार एका बूथ कमीतकमी १ हजार मतदारांवर बूथ बनविण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मतदार मतदान करू शकतील. कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मतदान केंद्रावर शांत वातावरणात मतदान करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिले, काँग्रेसचं स्टिंग ऑपरेशन

आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिल्याचं गुजरातमधील काँग्रेसचे तत्कालीन आमदार सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. या व्हिडिओमध्ये सोमाभाई पटेल यांनी म्हटले आहे की, आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपाने मला पैसे दिले होते. नाही तर कारणाशिवाय आमदार आपल्या पदाचा राजीनामा का देईल? राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी कोणालाही १० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले नाहीत. काही जणांना निवडणुकीत उमेदवारी, तर काहींना पैसे देण्यात आले.

गुन्हा दाखल करा

गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा म्हणाले की, भाजपाने आमदारांच्या खरेदी-विक्रीचा घोडेबाजार सुरू केला. भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा भाजपने आमदारांना विकत घेण्यासाठी वापरला. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे गुजरातमधील खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणीही अमित चावडा यांनी केली.

 

 

 

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा