शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चहाच्या मळ्यात मतांचे राजकारण; चहापत्ती वेचणारे हात काेणाला देणार मत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:05 IST

भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले.

गुवाहाटी : काेट्यवधी लाेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून हाेते. या चहासाठी लागणारी चहापत्ती ज्या ठिकाणाहून येते त्या आसाममधील राजकारण सध्या चहामय झाले आहे. आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये तब्बल आठ लाखांहून अधिक मतदार असून, प्रत्येक राजकीय पक्ष त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक हाेणार आहे. एकूण १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी २७ मार्चला मतदान हाेणार आहे. त्यापैकी ३८ मतदारसंघ हे चहाचे मळे असलेल्या जाेरहाट, गाेलाघाट, शिवसागर, दिब्रूगढ, टिनसुकिया, विश्वनाथ आणि साेनितपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यात चहाचे मळे तब्बल ८५० असून, आठ लाखांहून अधिक कामगार त्याठिकाणी आहेत. म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना चहाच्या मळ्यांनी खुणावले आहे.

भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पातही चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक हजार काेटींचे पॅकेजही जाहीर करण्यात आले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या भागात यावेळी पाच प्रचार सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचा यंदा या क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांना पुन्हा काबीज करण्यासाठी जाेरदार प्रयत्न दिसून येत आहे. 

लव्ह अँड लँड जिहाद रोखण्यासाठी कायदा करणार : शहाकमालपूर : आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास लव्ह अँड लँड जिहादच्या धोक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे सांगितले. एका सभेत बोलताना ते म्हणाले की, आसामची संस्कृती आणि सभ्यता मजबूत करण्यासाठी योग्य कायदा व धोरणे तयार केली जातील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एआययुडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना आसामची ओळख, प्रतिनिधी बनविले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी हे एक पर्यटक असून केवळ निवडणुकीत ते दोन ते तीन दिवस राज्यात येतात, नंतर पाच वर्षे गायब होतात, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :BJPभाजपा