शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:50 IST

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला.

रायपूरः छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा आणि त्यांच्या गाडीचालकाचा मृत्यू झाला. तर तीन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केलं आहे. मोदी म्हणाले, या नक्षलवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. जे जवान शहीद झाले, त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.छत्तीसगडमधला दंतेवाडा हा नक्षल प्रभावित भाग आहे. या भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी घातपात करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यादृष्टीनं कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तरीही हा हल्ला घडवून आणला गेला. मांडवी हे सभा आटोपून घरी येत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात त्यांचा आणि त्यांच्या गाडीचालकाचा मृत्यू झाला, तर पाच जवान गंभीररीत्या जखमी झाले. त्यातील तीन जवान शहीद झाले आहेत. मांडवी यांच्यासह त्यांचा चालक आणि तीन जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला नक्षलवादी विरोधी ऑपरेशनचे डीआयजी पी. सुंदर राज यांनी दुजोरा दिला आहे.या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाची हानी होऊन छत्तीसगड पोलीस दलाचे पाच जवान गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलप्रभावीत दांतेवाडा विभागात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019