मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 05:03 PM2021-07-07T17:03:37+5:302021-07-07T17:09:14+5:30

PM Modi Cabinet Expansion: भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

PM Modi Cabinet Expansion: Babul Supriyo expresses grief over resignation of minister | मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट 

मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट 

Next
ठळक मुद्देमला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मी राजीनामा दिलामला मंत्रिमंडळात सहभागी करून देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतोमंत्रिपदाच्या कार्यकाळात माझ्यावर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत याचा मला आनंद

नवी दिल्ली - पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये काही मंत्र्यांचा खांदेपालट होणार आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांचा राजीनामाही घेण्यात आला आहे. त्यामुळे काही नेत्यांना धक्का बसला आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत मंत्रिपदावर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. (Babul Supriyo expresses grief over resignation of minister)

मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. यामध्ये एकूण ४३ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आपल्या फेसबुक पोस्टममध्ये बाबूल सुप्रियो म्हणाले की, हो, मला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मी राजीनामा दिला आहे. मला मंत्रिमंडळात सहभागी करून देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.

मंत्रिपदाच्या कार्यकाळात माझ्यावर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत याचा मला आनंद आहे. मी माझा मतदारसंघ असलेल्या आसनसोलच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे तेथील जनतेने २०१९ मध्ये मला तीन पट अधिक मताधिक्याने विजयी केले, असे बाबूल सुप्रियो त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.
बंगालमधून खासदास असलेल्या बाबूल सुप्रियो यांनी मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर दु:ख व्यक्त करताना लिहिले की, बंगालमधून ज्या लोकांना मंत्री बनवण्यात येऊ शकते, त्यांचे मी आता नाव घेऊ शकत नाही. मात्र मी त्यांना शुभेच्छा देतो. मी माझ्यासाठी निश्चितपणे दु:खी आहे. मात्र ज्यांना मंत्री बनणवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी मी आनंदी आहे.  

Web Title: PM Modi Cabinet Expansion: Babul Supriyo expresses grief over resignation of minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.