Phone tapping: पिगासस स्पायवेअरद्वारे 40 बड्या पत्रकारांचेही फोन टॅपिंग; इस्त्रायली कंपनीने सांगितले 'ती एजन्सी अधिकृत'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:51 PM2021-07-18T22:51:18+5:302021-07-18T22:52:19+5:30

Pegasus spyware Phone tapping misuse: सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंगबाबत भाष्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. फोन टॅपिंग प्रकरणी आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट एक अहवाल जाहीर करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Phone tapping of 40 journalists by Pegasus spyware; Forensic Tests Confirm on some presence | Phone tapping: पिगासस स्पायवेअरद्वारे 40 बड्या पत्रकारांचेही फोन टॅपिंग; इस्त्रायली कंपनीने सांगितले 'ती एजन्सी अधिकृत'

Phone tapping: पिगासस स्पायवेअरद्वारे 40 बड्या पत्रकारांचेही फोन टॅपिंग; इस्त्रायली कंपनीने सांगितले 'ती एजन्सी अधिकृत'

Next

केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप (Phone Tapping) केले जात असल्याचा दावा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यात मोठमोठ्या वृत्त समुहांच्या 40 हून अधिक पत्रकारांचे अज्ञात एजन्सीकडून फोन टॅप केल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यासाठी पिगासस स्पायवेअरचा (Pegasus spyware) वापर करण्यात आला होता. (The phone numbers of over 40 Indian journalists appear on a leaked list of potential targets for surveillance by an unidentified agency using Pegasus spyware)

दी वायरने या बाबतचे वृत्त दिले आहे. हे पत्रकार हिंदुस्थान टाईम्सचे कार्यकारी संपादक शिशीर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस सारख्या बड्या वृत्त समुहांमधील आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंगबाबत भाष्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. फोन टॅपिंग प्रकरणी आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट एक अहवाल जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली असल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटले होते. दरम्यान भारत सरकारने या प्रकरणी लक्ष घालण्याचे काही वृत्तसंस्थांना कळविले आहे.


पिगासस प्रोजेक्टवर लक्ष ठेवणाऱ्या या तज्ज्ञांना असे आढळले की, या यादीतील 10 भारतीयांचे फोन नंबरवर एकतर पिगाससकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाला किंवा हॅकिंग यशस्वी झाले आहे. 

पिगासस हे इस्त्रायली कंपनीने बनविलेले एक हॅकिंगचे हत्यार आहे. एनएसओ कंपनीच्या दाव्यानुसार याचा वापर फक्त सरकारी कामांसाठी म्हणजेच दहशवादी कारवांयांचा शोध घेण्यासाठी केला जातो. कंपनीने त्यांच्या भारतीय ग्राहकांची यादी जाहीर करण्यास नकार दिला. तसेच ज्या लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे किंवा करण्य़ात आले त्यांची नावे देखील जाहीर करण्यास कंपनीने नकार दिला आहे. तसेच ज्या एजन्सीने भारतीय नंबरवर लक्ष ठेवले ती अधिकृत भारतीय एजन्सी असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. द वायरचे दोन संपादकही या यादीमध्ये आहेत. 

द वायरच्या रोहिनी सिंग यांचा देखील नंबर या लीक झालेल्या यादीमध्ये आहे. गृहमंत्री अमित शहांचा मुलगा जय शहा याच्या उद्योगधंद्यांबाबत वृत्तांकन केल्यापासून त्यांचा नंबर पिगाससकडे गेल्याचे समजते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योजक निखील मर्चंट आणि जय शहा यांच्यातील व्यावसायिक संबंध, पीयुष गोयल आणि उद्योजक अजय पिरामल यांच्यातील व्यवहार आदींवर रोहिनी सिंग काम करत होत्या, असा दावा द वायरने केला आहे. 

फ्रान्सच्या एका संस्थेने ही यादी जगभरातील 15 हून अधिक वृत्तसंस्थांना दिली. या वृत्तसंस्थांनी एकत्रपणे यावर काम करत जवळपास 10 देशांतील 1500 हून अधिक लोकांचे नंबर शोधले आहेत. कंपनीने हे सॉफ्टवेअर 36 हून अधिक देशांना विकले आहे. 

Web Title: Phone tapping of 40 journalists by Pegasus spyware; Forensic Tests Confirm on some presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.