शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:59 IST

शरद पवारांनी व्यक्त केला ईव्हीएमबद्दल संशय

मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपानं विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपानंबारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपानं यंदा कंबर कसली. बारामती पाडली, तर त्यावर पुस्तक लिहावं लागेल असं विधान काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याशिवाय यंदा बारामती सुप्रिया सुळेंना जड जाईल, अशी विधानं भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला. 'ईव्हीएम हॅक करता येतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मात्र कोणतंही बटण दाबल्यास मत भाजपालाच जातं, अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. भाजपा नेत्यांचे बारामतीबद्दलचे दावे पाहता, त्यांनी काही नियोजन केलंय की काय, अशी शंका येते,' असं पवार म्हणाले.बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकांचा निवडणुकांवरील विश्वास जपायला हवा. त्यासाठी निवडणूक आयोगानं आवश्यक सुधारणा घडवायल्या हव्यात. लोकांचा विश्वास उडाल्यावर मग ती कोणत्याही टोकाला जातात. त्यामुळे त्यांचा विश्वास जपणं गरजेचं आहे, असंदेखील पवार म्हणाले. बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांचं आव्हान आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस