शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

देहूत पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आले आमनेसामने, पुढे घडलं असं काही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 17:37 IST

निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार शुक्रवारी समोरासमोर आले.

पुणे : निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार शुक्रवारी समोरासमोर आले. मात्र यावेळी बोलणे तर दूरच पण एकमेकांकडे बघणेही त्यांनी टाळले. 

    निवडणुका जाहीर झाल्यावर मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढायला सुरुवात होते. पार्थ यांनी मागील आठवड्यात कार्ला गडावरील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर तुकाराम बीज सोहळ्याचा मुहूर्त साधून ते देहूमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र त्यांच्याआधी तिथे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. अटीतटीच्या लढतीतील हे दोन उमेदवार समोर आल्यावर एकमेकांशी बोलतील का किंवा शुभेच्छा देतील का असे प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी कोण पार्थ पवार अशी टीका खासदार बारणे यांनी केली होती. त्यावर ‘मी कामातून पार्थ कोण हे दाखवून देईन, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर बारणे आणि पवार या ठिकाणी एकत्र आल्यानंतर दोघे एकमेकांशी काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला नाही.उत्सवाची मुख्य आरती सुरु झाल्यावर हे दोघे चक्क एकमेकांच्या शेजारी दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ उभे होते. यावेळेत त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही.आरतीनंतर तुकोबांचे दर्शन घेऊन दोघेही मंदिराबाहेर पडले.  

पवार प्रथमच बीजसोहळ्यात

 पुणे जिह्यातील तीर्थक्षेत्राच्या सोहळ्यात पवार घराणे मात्र, सहभागी होत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. मावळ लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यावर पार्थ पवार यांनी सुरूवात केली आहे. आजोबा आणि वडिलांची परंपरा खंडीत करून पार्थ पवार मतांचा जोगवा मागण्यासाठी देहूतील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यात सहभागी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmavalमावळdehuदेहूsant tukaramसंत तुकाराम