शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Pankaja Munde Video: धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण...; पंकजा मुंडेंचे 'रोखठोक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 19:46 IST

Pankaja Munde talk on Dhananjay Munde's two marriages issue:  राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) दुसऱ्या लग्नाच्या प्रकरणावर दिले आहे.

Pankaja Munde vs Dhananjay Munde: धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) दुसऱ्या लग्नाच्या प्रकरणावर दिले आहे. (no politics on Dhananjay Munde's two marriages issue, told by Bjp Leader Pankaja Munde.)

कुटुंबामध्ये कोणते वाद झाले तर राजकारण केले नाही, धनंजय मुंडे यांच्या खासगी प्रकरणावेळी तुम्ही मौन बाळगले असे का, असा प्रश्न लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांना केला. यावर मी मौन बाळगले नाही, असे उत्तर पंकजा यांनी दिले आहे. 

मी कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तीक जीवनामध्ये कधीही सार्वजनिक स्टेटमेंट करत नाही किंवा पाठीमागेही बोलत नाही. हे माझे एक तत्व आहे. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे त्या म्हणाल्या.  

दुसऱ्याच्या अपयशावर त्याच्या अडचणींवर मला इमारत बांधायची नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे घडले त्यावर मी त्याचे समर्थन करू शकत नाही, हे मी स्पष्ट केले आहे. मी जेव्हा जन्मले तेव्हा मी पहिली स्त्री आहे हे निसर्गाकडून समजले, नंतर मी कोणाची मुलगी आहे, माझ्याकडे काय वारसा आहे ते कळले. त्यामुळे मी माझे मत मांडले. मी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा उद्देश नाही, भूतकाळातही केले नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्राला विसरून भविष्यात देशाच्या राजकारणात जाणार का या प्रश्नावर त्यांनी, महाराष्ट्राला मी विसरणार नाही, महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे. भविष्यकार नसल्याने मला पुढचे काही भाकित करता येणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे