शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 7:08 AM

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन  चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर  दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य विधिमंडळाचे आठ दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा, लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या तोफांना सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्याच वेळी खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे हा विरोधकांचा धंदाच झाला असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन  चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर  दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार हे ८ मार्चला सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर झालेला प्रतिकूल परिणाम, उत्पन्न घटल्याने विकासकामांना लावावी लागलेली कात्री, केंद्र सरकारने मदतीचा अखडता घेतलेला हात, ही आव्हाने समोर असताना राज्याची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी अजित पवार कोणत्या उपाययोजना जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रपरिषदेत तोफ डागली. केंद्र सरकारकडून जीएसटीचे २९ हजार कोटी, पुनर्वसनाचे ४ हजार ७०० कोटी रुपये येणे बाकी आहेत. वीज बिलावर ओरडणारे विरोधक मोदी आले आणि पेट्रोलने शतक गाठले त्यावर का बोलत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी व मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही सरकारसोबत आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले, त्यांचा मी आभारी आहे, अशी पुस्ती मुख्यमंत्र्यांनी जोडली.खा. डेलकर मृत्यूप्रकरणीनिष्पक्ष चौकशी : मुख्यमंत्रीदादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटमध्ये काही भाजप नेत्यांची नावे लिहिलेली असतील, तर मग तेही राजीनामे देणार का, असा सवाल करीत आपल्याला या आत्महत्येचे राजकारण करायचे नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला हाणला. डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी निष्पक्षच होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरे