शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

"जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार," या पक्षाने केली घोषणा

By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 6:25 PM

Farmer Protest & Politics News : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटत आहेत.

ठळक मुद्देयावेळी होणाऱ्या निवडणुकीत आरएलडीचे तिकीट त्याच नेत्यांना मिळेल जे आंदोलनामध्ये सहभागी होतीलजे आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत. मग ते कुठल्याही पक्षाचे असेनात जनतेने त्यांच्याकडून जबाब मागितला पाहिजेजे लोक रामाच्या नावावर मत मागत आहेत आणि देणग्या गोळा करत आहेत, त्यांना जनतेने विचारले पाहिजे

लखनौ - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी एका राजकीय पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जो ने शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होईल. त्यालाच पुढील निवडणुकीत तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रील लोकदल पक्षाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी केली आहे. यावेळी जयंत चौधरी यांनी २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन ट्रॅक्टर मोर्चा काढावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.आरएलडीचे उपाध्यक्ष जयंत चौधरी हे बडौत येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी कृषी कायद्यांचा विरोध केला. तसेच सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि हे कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत, असे आवाहन केंद्र सरकारला केले. यावेळीच त्यांनी ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

जयंत चौधरी म्हणाले की, यावेळी होणाऱ्या निवडणुकीत आरएलडीचे तिकीट त्याच नेत्यांना मिळेल जे आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यासाठी एक नोंदवही ठेवा, त्यामध्ये तिकीट मिळालेल्या नेत्यांची नावे लिहून द्या. जे आंदोलनाला आलेले असतील त्यांनाच तिकीट दिले जाईल. जे आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत. मग ते कुठल्याही पक्षाचे असेनात जनतेने त्यांच्याकडून जबाब मागितला पाहिजे.यावेळी राम मंदिरासाठी स्वीकारण्यात येत असलेल्या देणग्यांवरूनही जयंत चौधरी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. जे लोक रामाच्या नावावर मत मागत आहेत आणि देणग्या गोळा करत आहेत, त्यांना जनतेने विचारले पाहिजे, असे जयंत चौधरी म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण