शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

West Bengal Election : उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय; ममता बॅनर्जींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 18:48 IST

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

ठळक मुद्देममता बॅनर्जींनी साधला पंतप्रधानांवर निशाणादाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होत नाही, ममता बॅनर्जींचा टोला

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना टोला लगावला. उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीचीच वाढ होतेय, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींना टोला लगावला. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या.शुक्रवारी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. "उद्योगांची वाढ थांबली आहे. परंतु त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढत आहे. काहीवेळा ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवतात आणि काहीवेळा ते स्टेडिअमचं नाव बदलून आपलं नाव ठेवतात. त्यांच्या डोक्यात काही बिघडलंय, त्यांच्या स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय," असं म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होत नाही"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होता येत नाही. नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सरकारी मालमत्ता विकायला काढल्या जात आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत," असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ६, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ७, झाडग्राम जिल्ह्यातील ४ तर पुरुलिया जिल्ह्यातील ९, बाकुंडा जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, यात ७३ लाख ८० हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी