शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:30 IST

सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे.

- दीपक शिंदेसातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे. दोघांच्याही हटके स्टाईलचीच मतदारांमध्ये जास्त चर्चा आहे. त्याबरोबरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. उदयनराजे यांनी नरेंद्र मोदींवर टाकी केली आहे. कधी-कधी ते नरेंद्र पाटील यांच्या फर्राटेदार मिशी आणि माथाडी कामगारांवरील अन्यायावरही बोलतात. तर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांनी गेल्या दहा वर्षांत दहशतीचे राजकारण केले, जिल्ह्याचा विकास केला नाही, उद्योग आणले नाहीत. त्यामुळे आता लोकांनी नवीन पर्याय निवडला पाहिजे, असे आवाहन करतात.जिल्ह्याच्या एका भागात प्रचंड पाऊस पडतो, तर दुसरीकडे दुष्काळ, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होत नाही. कोयना, उरमोडी, धोम - बलकवडी या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील तरुण युवक पुणे आणि मुंबईकडे वळू लागले आहेत. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि स्थानिकांना गावातच रोजगार मिळला, तर उमेदवारांना मते मागायला मतदारांनाकडे याचना करावी लागणार नाही.

सध्या केवळ एकमेकांवर आरोप करून आता मला निवडून द्या, मी तुमच्यासाठी नक्की काम करतो, असे म्हणून काहीच उपयोग होताना दिसत नाही. खासदार उदयनराजेंसाठी सुरुवातीच्या टप्प्यात ही निवडणूक अगदी सहज सोपी होती. फारसा तगडा उमेदवार नसल्याने उदयनराजेंनी मागील दोन निवडणुकांत चांगले मताधिक्य घेतले, पण यावेळी स्वत: उदयनराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपार मेहनत घ्यावी लागत आहे. नरेंद्र पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचारासाठी चांगली यंत्रणा उभी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंसोबत असले, तरी मनाने अजूनही मदत करताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपली विधानसभेची तयारी या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहत आहे.
>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात विविध विकास कामे केली आहेत. पुढील काळातही जिल्ह्यातील अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. केवळ घोषणा करून थांबत नाही, तर प्रत्यक्षात काम केले जाते. विरोधकांना आमची कामे दिसत नाहीत. कारण ते यात्रेपुरते जिल्ह्यात येतात.- उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात कोणतीही कामे झालेली नाहीत. केवळ दहशतीच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. त्यामुळे आता लोकांना विकास हवा आहे. जिल्ह्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत, पण त्याकडे लक्ष्यच दिले गेले नाही. त्यामुळे या कामांकडे प्राधान्याने पहायला हवे.- नरेंद्र पाटील, शिवसेना>कळीचे मुद्देजिल्ह्यात दहशतवाद आणि रोजगाराचा प्रश्न आहे, पण याबाबत उपाययोजना उमेदवारांकडून होत नाही.उमेदवारांनी विकासाच्या मुद्दांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर अधिक भर दिला आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसातारा