शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा हवा; काँग्रेसमध्ये सूूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:59 IST

Congress, Balasaheb Thorat: पक्ष प्रभारींनी जाणून घेतली मते

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना वेग आला असून, प्रदेशाध्यक्ष बदलायचे असतील तर नवा चेहरा ओबीसी समाजाचा द्यावा, असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत मते जाणून घेतल्यानंतर ते पक्षश्रेष्ठींना याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.  पाटील हे सध्या मुंबईत असून, त्यांनी मंगळवारी रात्रीपासून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी आधीच दर्शविली आहे. तरुणांना संधी मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे थोरात यांनी म्हटले होते. पाटील यांनी नेत्यांशी केलेल्या चर्चेत प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावांबाबत चाचपणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच महसूलमंत्री, तसेच पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेतेपद अशी तीन महत्त्वाची पदे आहेत. त्‍यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वेगळ्या व्यक्‍तीकडे देण्यात यावी, अशी चर्चा काँग्रेस पक्षात सुरू झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनीदेखील त्‍याला आपली हरकत नसून, बदल करायचाच असेल तर नवीन आणि तरुण चेहऱ्याच्या हाती ही जबाबदारी सोपवावी, अशी भूमिका मांडली आहे.

एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह पृथ्‍वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष निवडायचा असेल तर तो बिगर मराठा समाजातील असावा असा एक सूर पक्षात आहे.  सध्या काँग्रेससह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत. काँग्रेसने मराठा समाजाला मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व दिलेले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी नेत्याचा विचार व्हावा, अशी चर्चा आहे. त्यादृष्टीने खा. राजीव सातव विधानसभाध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार विजय वडेट्टीवार या नेत्‍यांची नावे चर्चेत आहेत. 

तूर्त बदल नकोn सध्या स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्‍यामुळे सध्या नेतृत्‍वबदल नको, असाही एका गटाचा सूर आहे. n विशेषत: मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांनी थोरात यांना बदलू नये, असा आग्रह धरल्याचे समजते.

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात