शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण नव्हे, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय; प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 17:23 IST

राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं.

राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं. त्यावर आता राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात. शिवसेनेची विचारधारा आता चंचल झालीय, अशी उपरोधिक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"संजय राऊत बोलतात त्याप्रमाण राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार करावा", असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. 

वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची नुसती टोलवाटोलवी सुरू असल्याचंही दरेकर यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय आता मोदींच्या हातात असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानावर ते बोलत होते. 

५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री ही 'कमिटमेंट'राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी संदर्भातील वावड्यांबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचाच ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला यावेळी लगावला आहे. 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा