शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे तिकीट नाही दिले, भाजपा कार्यकर्त्याने नेत्याला झाडाला बांधून घातले

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 08:09 IST

Panchayati Raj elections News : निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील नागौर येथील भौरुंदा मंडल परिसरात घडली ही घटना नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी मंडल अध्यक्ष राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांना झाडाला बांधून घातलेया संपूर्ण प्रकाराचे फोटो काढले गेले. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरवले गेले

नागौर - निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यास अनेकदा कार्यकर्ते आक्रमक होतात. काही ठिकाणी बंडखोरी होते. आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले जाते. मात्र राजस्थानमधील नागौरमध्ये पंचायत राज निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. बराच वेळ चाललेल्या वादविवादानंतर या नेत्याची सुटका करण्यात यश मिळाले. मात्र हा गोंधळ स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे भाजपावर नामुष्की ओढवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील नागौर येथील भौरुंदा मंडल परिसरात ही घटना घडली. येथे नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी मंडल अध्यक्ष राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांना झाडाला बांधून घातले. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून खडेबोल सुनावले. पंचायत राज निवडणुकीसाठी तिकीट वाटप योग्य पद्धतीने केले गेले नाही, असे नेत्यांना सांगितले. या संपूर्ण प्रकाराचे फोटो काढले गेले. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरवले गेले.अखेरीस काही जणांनी मध्यस्थी करत कार्यकर्ते आणि नेत्यांमधील तणाव शांत केला. त्यानंतर राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुक्तता करण्यात आली. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.राजस्थानमध्ये पंचायत राज संस्थांची निवडणूक होत आहे. ही निवडणूक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चार टप्प्यात होणार आहे. काल या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान जा निवडणुकीत गटबाजीमुळे अनेक ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणRajasthanराजस्थान